menu
ब्रेकिंग न्यूज
ताज्या बातम्यांसाठी पेज रिफ्रेश करा...

पालघरचा मान उंचावला! आदिवासी लोककलेला राष्ट्रीय स्तरावर गौरव

पालघरचा मान उंचावला! आदिवासी लोककलेला राष्ट्रीय स्तरावर गौरव




पालघर | आदिम मीडिया पोर्टल

पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी समाजाचे ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या धिंडा यांना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

तारपा वादनाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि लोककला जपण्यासाठी त्यांनी अनेक दशकांपासून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे वारली संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

भिकल्या धिंडा यांच्या या यशामुळे आदिवासी समाजातील युवा कलाकारांना प्रेरणा मिळणार असून, पालघर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वारशालाही नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध आदिवासी संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, हा सन्मान संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

— आदिम मीडिया पोर्टल


मागील पृष्ठ पुढील पृष्ठ
शेअर करा