menu
ब्रेकिंग न्यूज
ताज्या बातम्यांसाठी पेज रिफ्रेश करा...

नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचा निषेध: उद्या २३ जुलै रोजी 'कळवण शहर' बंद! आदिवासी इंडिया न्यूज

नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाचा निषेध: उद्या २३ जुलै रोजी 'कळवण शहर' बंद!


✍️ प्रतिनिधी: मनोहर बागुल 📍 ठिकाण: कळवण 📅 दिनांक: २३ जुलै २०२६


(फोटो सौजन्य: आदिवासी इंडिया न्यूज)



कळवण : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थी व पालकांवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बहुजन हृदयसम्राट आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत उद्या, दिनांक २३ जुलै रोजी 'कळवण शहर बंद' ठेवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडी कळवण तालुक्याच्या वतीने घेण्यात आला आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे तसेच पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांना कळवण बंद बाबतचे अधिकृत निवेदन सादर केले.

 निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी:

निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश खरे, जिल्हा सचिव राम बस्ते, तालुकाध्यक्ष प्रकाश बस्ते, तालुका सचिव भाऊसाहेब गांगुर्डे, तालुका उपाध्यक्ष शशिकांत निरभवणे, मनोज साळवे, राजेंद्र गांगुर्डे, बाळासाहेब निकम, दिनेश बस्ते, परशराम बस्ते आणि राहुल गांगुर्डे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

समविचारी पक्ष व नागरिकांना सहभागाचे आवाहन
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध सरकारकडे न्याय मागण्यासाठी कळवण तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, विद्यार्थी व पालकांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन बंद यशस्वी करावा, असे नम्र आवाहन वंचित बहुजन आघाडी कळवण तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

"विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन करणार नाही; उद्याचा कळवण बंद यशस्वी करा!"

आदिवासी इंडिया न्यूज | डिजिटल मीडिया

ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी आमच्याशी जोडले जा.

📞 संपर्क: 8390347402

मागील पृष्ठ पुढील पृष्ठ
शेअर करा