menu
ब्रेकिंग न्यूज
ताज्या बातम्यांसाठी पेज रिफ्रेश करा...

अकोला: समाजसेवक कार्तिक सुरतने यांच्या पाठपुराव्याला यश;

आदिवासी इंडिया न्यूज
वर्ष १ | अंक नियमित धुळे, ०१ ऑगस्ट २०२६ डिजिटल आवृत्ती
❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖

अकोट व तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागात 'विशेष आधार नोंदणी व दुरुस्ती शिबिर' होणार!

Main News Photo
AIN न्यूज प्रतिनिधी (कार्तिक सुरतने)
अकोला / अकोट / तेल्हारा (विशेष प्रतिनिधी):

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला (महाराष्ट्र शासन) यांच्या वतीने अकोट व तेल्हारा तालुक्यातील आदिवासी बहुल गावांसाठी "विशेष आधार नोंदणी व दुरुस्ती शिबिर" आयोजित करण्याचे आदेश दिनांक २०/०७/२०२६ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. समाजसेवक कार्तिक सुरतने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे आधार कार्डशी संबंधित प्रश्न मार्गी लागणार असून, यामुळे शेकडो आदिवासी कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, दुर्गम भागातील आदिवासी बांधव, वृद्ध, महिला व बालकांना आता थेट गावातच नवीन आधार कार्ड काढण्याची आणि जुन्या आधार कार्डमधील चुका दुरुस्त करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. आधार कार्ड अद्ययावत झाल्यामुळे या भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे सोपे होणार आहे.



या शिबिरांमध्ये खालील गावे कव्हर होणार आहेत:

अकोट तालुका: वस्तापूर, शहापूर, राहणापूर, मलकापूर, गोड, गुल्हरघाट, कैलापणी, कासोद, बोरडी, खिरकुंड, डांगरखेडा, चिंचपाणी, जनुना, कोहा, कुंड, महागाव, पोपटखेड, रुपारी, मारडी आणि खिरकुंड बु.

तेल्हारा तालुका: चिपी, मिली, बोरव्ह, पिंपळकुटा, वारी, गायराणा, चंदनपूर, सालोण व धोंडआखर.

कार्तिक सुरतने यांच्या पाठपुराव्यामुळे शेकडो आदिवासी मुलांचे व कुटुंबांचे आधार कार्डचे काम मार्गी लागणार असून, या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे आभार मानले जात आहेत. परिसरातील नागरिकांनी या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
"शिबिराचे वेळापत्रक: प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार खालीलप्रमाणे शिबिरे आयोजित केली जाणार आहेत: पोपटखेड: ०९/०८/२०२६ शहापूर: २३/०८/२०२६ राहणापूर: २४/०८/२०२६ महागाव: २६/०८/२०२६"
❖ समाजसेवक : कार्तिक सुरतने
मागील पृष्ठ पुढील पृष्ठ
शेअर करा