❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖
माजी खासदार डॉ. हिना गावीत व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा; 'बिरसा फायटर्स' आक्रमक!
AIN न्यूज (प्रतिनिधी - अर्जुन पावरा):
नंदुरबार / शहादा
नंदुरबार जिल्हयातील आदिवासी समाजाच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी, माजी खासदार डॉ. हिना गावीत व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याबद्दल विजय चौधरी यांनी जातीवाचक, अपमानास्पद व आक्षेपार्ह भाषेचा वापर करून अपमानित केल्याप्रकरणी संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ (ॲट्रॉसिटी) तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी 'बिरसा फायटर्स' संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे अधिकृत निवेदन शहादा येथे तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांबाबत वापरण्यात आलेल्या अयोग्य आणि जातीवाचक भाषेमुळे आदिवासी समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात आदिवासी बांधवांमध्ये रोष व असंतोष पसरला आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर लवकरात लवकर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका बिरसा फायटर्स संघटनेने घेतली आहे.

"निवेदनातील प्रमुख मुद्दे व मागण्या:
गंभीर स्वरूपाचे कृत्य: कायद्यापुढे सर्व समान असून, कोणत्याही व्यक्तीने जातीवाचक अपमान, अवमानकारक वक्तव्ये किंवा समाजाच्या भावना दुखावणारे कृत्य केल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी: विजय चौधरी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व स्वाक्षऱ्या: सदर निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या प्रमुख स्वाक्षऱ्या आहेत."