❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖
सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टीचा फटका; दरड कोसळल्याने भेगू-आळीवदांड रस्ता बंद, रुग्णांची मोठी गैरसोय
छायाचित्र: तुषार गवे
सुरगाणा :
सुरगाणा तालुक्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अतिवृष्टीचा मोठा फटका वाहतुकीला बसला आहे. संततधार पावसामुळे भेगू ते आळीवदांड हा शॉर्टकट रस्ता ठिकठिकाणी दरड कोसळल्याने पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही अनुचित घटनेला टाळण्यासाठी नागरिकांनी या मार्गावरून अजिबात प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत असून, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सध्या मुख्य आणि शॉर्टकट रस्ता बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना बाऱ्हे येथे जाण्यासाठी तब्बल १५ ते २० किलोमीटरचा मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेचा सर्वात मोठा फटका रुग्णांना बसत असून, गावात एखादा आणीबाणीचा (इमर्जन्सी) रुग्ण असल्यास, त्याला तातडीने बाऱ्हे येथील रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. १५ ते २० किलोमीटरचे जास्तीचे अंतर पार करण्यात अमूल्य वेळ वाया जात असल्याने रुग्णांच्या जिवावर बेतण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबवावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

"सुरगाणा तालुक्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे भेगू ते आळीवदांड हा शॉर्टकट रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून, सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी या मार्गावरून अजिबात प्रवास करू नये, असे सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे."