menu
ब्रेकिंग न्यूज
ताज्या बातम्यांसाठी पेज रिफ्रेश करा...

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध; आज मोलगी शहर कडकडीत बंद


वर्ष १ | अंक नियमित धुळे, शनिवार, २५ जुलै २०२६ डिजिटल आवृत्ती
❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖

नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध; आज मोलगी शहर कडकडीत बंद

Main News Photo
छायाचित्र: अर्जुन पावरा
मोलगी (प्रतिनिधी - सुरतान पावरा, बिलगांव):

नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण, हक्क आणि न्यायासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आज (शनिवार, २५ जुलै) मोलगी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या 'मोलगी बंद'ची हाक दिली होती, ज्याला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

या बंदला शहरातील व्यापारी वर्ग, सामान्य नागरिक आणि विविध विद्यार्थी संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. सकाळपासूनच मोलगीतील सर्व बाजारपेठा, दुकाने, व्यापारी आस्थापने आणि शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. "शिक्षण आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे हा थेट लोकशाहीचा अपमान असून, विद्यार्थ्यांवर होणारा हा अत्याचार आम्हाला अजिबात मान्य नाही," अशी संतप्त आणि स्पष्ट प्रतिक्रिया आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.

रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी 'एकजुटीतून सत्ता हादरते' आणि 'ही लढाई प्रत्येक विद्यार्थ्यांची आहे' अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तसेच, शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सरकारने तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपला पाठिंबा नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
"या बंदला शहरातील व्यापारी वर्ग, सामान्य नागरिक आणि विविध विद्यार्थी संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. सकाळपासूनच मोलगीतील सर्व बाजारपेठा, दुकाने, व्यापारी आस्थापने आणि शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत."
❖ मोलगी, नंदुरबार
मागील पृष्ठ पुढील पृष्ठ
शेअर करा