menu
ब्रेकिंग न्यूज
ताज्या बातम्यांसाठी पेज रिफ्रेश करा...

पिंपळनेरमध्ये पांझरा नदीने गाठली धोक्याची पातळी;


वर्ष १ | अंक नियमित धुळे, शनिवार २५ जुलै २०२६ डिजिटल आवृत्ती
❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖ ◈ ❖

पिंपळनेरमध्ये पांझरा नदीने गाठली धोक्याची पातळी; नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा धोका, प्रशासनाकडून 'हाय अलर्ट' जारी!

Main News Photo
छायाचित्र: आदिवासी इंडिया न्यूज प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे पांझरा नदीने धोकादायक पातळी गाठली असून मध्यरात्री नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने शहरासह नदीकाठच्या आदिवासी वस्त्यांमध्ये पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. पाणीपातळीत झालेली ही अचानक वाढ आणि संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पिंपळनेर नगरपरिषद, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी तातडीने 'हाय अलर्ट' जारी केला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती समोर आली आहे.
"प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज"
❖ नगरपरिषद, पिंपळनेर

लाठीपाडा धरण 'फुल्ल'! पांझरा नदीला नवसंजीवनी; पिंपळनेर नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात जलपूजन

Sub News
पिंपळनेर शहरासह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून, पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पांझरा नदीवरील 'लाठीपाडा धरण' १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे.
पूर्ण बातमी वाचा ►

दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा बिरसा फायटर्सकडून तीव्र निषेध; दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी

Sub News
वैज्ञानिक तथा शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि 'नीट-यूजी' (NEET-UG) पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीत संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचा 'बिरसा फायटर्स' संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
पूर्ण बातमी वाचा ►

आजचा डिजिटल ईपेपर (शनिवार २५ जुलै २०२६)

Sub News
दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा बिरसा फायटर्सकडून तीव्र निषेध; दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी
पूर्ण बातमी वाचा ►
मागील पृष्ठ पुढील पृष्ठ
शेअर करा